जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील माऊली नगरात बंद घर फोडून घरातून सोन्याचे चांदीचे दागिने आणि एक मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना मंगळवार २२ एप्रिल रोजी सकाळी ६.३० वाजता समोर आले आहे. या संदर्भात दुपारी २ वाजता जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनकर खेमचंद पाटील वय-४३, रा.माऊली नगर, कोल्हे हिल्स परिसर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून खाजगी नोकरी करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. २१ एप्रिल ते २२ एप्रिल च्या दरम्यान त्यांचे घर बंद असताना मुख्य दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीटी २२६७) असा मुद्देमाल चोरून नेला. हे घटना मंगळवारी २२ एप्रिल रोजी सकाळी ६.३० वाजता समोर आला आहे. या संदर्भात दिनकर पाटील यांनी जळगाव तालुका पोलिसात या संदर्भात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संजय भालेराव हे करीत आहे.