चौथ्या क्रमांकावरील फलंदाजाचा अद्यापही शोध सुरूच

pant

नवी दिल्ली वृत्तसंस्था । क्रिकेट संघात चौथ्या स्थानावर कोणाला पाठवायाचे, ही बाब अजूनही भारतीय संघाला सतावत आहे. अनेक युवा फलंदाजांना या क्रमांकावर खेळण्याची संधी देण्यात आली. मात्र कोणाला निश्चित करायाचे, याविषयी संभ्रम आता युवा फलंदाज रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्यात निर्माण झाला आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० लढतीत फलंदाजीदरम्यान अजब किस्सा घडला. दोन फलंदाज बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर हे दोघेही एकाचवेळी मैदानाकडे चालले होते. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोण जाणार आहे. याबाबत दोघांमध्येही अस्पष्टता होती. गेल्या काही सामन्यांत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरणारा पंत मैदानात गेला. सामना संपल्यानंतर कर्णधार विराट कोहलीला या प्रकारावर स्पष्टीकरण द्यावं लागले होते. दोन्ही फलंदाजांपर्यंत योग्यरित्या संदेश पोहोचला नव्हता. त्यामुळं ते दोघेही एकाचवेळी मैदानाकडे जात होते. असे कोहलीने सांगितले.

Protected Content