वारीस पठाण यांच्याविरुद्ध स्थानकात गुन्हा दाखल

Waris Pathan

कर्नाटक (वृत्तसंस्था) १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा ही गोष्ट, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी एआयएमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांच्यावर कर्नाटकातील कलबुर्गी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा ही गोष्ट, असे धार्मिक तेढ निर्माण करणारे वादग्रस्त वक्तव्य वारीस पठाण यांनी १५ फेब्रुवारी रोजी एका जाहीर कार्यक्रमात केले होते. त्यानंतर एआयएमआयएम अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी वारीस पठाण यांच्यावर कारवाई करत माध्यमांसोबत बोलण्यास पक्षाकडून बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपासाला लवकरच सुरुवात होणार आहे.

Protected Content