जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील ममुराबाद शिवारातील शेत गट क्रमांक ३०७ मधील शेतात अचानक लागलेल्या आगीत चारा जळून खाक झाला आहे. ही घटना घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव ग्रामीण पोलीसांनी दिलेली माहिती अशी, संदीप छगन कोळी वय ३० रा. तुरखेडा ता.जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे ल ममुराबाद शिवारातील शेत गट क्रमांक ३०७ मध्ये शेत आहे. मंगळवारी १९ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या शेतातील चाऱ्याला आग लागली. या आगीत शेतील संपुर्ण चारा जळून खाक झाला आहे. यात शेतकऱ्याचे मोठ नुकसान झाले आहे. याप्रकरणी बुधवारी २० मार्च रोजी दुपारी दीड वाजता पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ प्रदीप राजपूत करीत आहे.