जळगाव विमानतळावर मॉक ड्रीलमुळे धावपळ

जळगाव प्रतिनिधी । येथील विमानतळावर बॉम्ब असल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र हे मॉक ड्रील असल्याचे समजल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला.

शनिवारी विमानतळाच्या फोनवर एका सुटकेसमध्ये बाँब ठेवल्याची माहिती एका अज्ञात व्यक्तीने दिल्याने खळबळ उडाली. काही क्षणातच परिसर खाली करण्यात आला.सुरक्षा यंत्रणांनी तातडीने या परिसराची तपासणी केली. मात्र काही वेळातच हे मॉक ड्रील असल्याचे सांगण्यात आले. या सर्व प्रक्रियेतून विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा किती सतर्क आहे ? याची तपासणी करण्यात आली.

Protected Content