पिंपरखेड तांडाजवळील फाट्यासमोर कारच्‍या धडकेत दुचाकीस्वार जखमी

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी‍ | चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड तांडा गावानजीकच्या फाट्यासमोर भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना १ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजता घडली होती. जखमी दुचाकीस्वरावर उपचार घेतल्यानंतर अखेर चौकशीअंती बुधवारी २० मार्च रोजी रात्री १० वाजता कारवरील चालकाविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, साईदास सदू चव्हाण वय-४५, रा. पिंपळखेड तांडा ता.चाळीसगाव हा तरुण १ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजता पिंपरखेड तांडाच्या पुढे असलेल्या फाट्याजवळ दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीएन २०७४) ने जात असताना समोरून येणारी कार क्रमांक (एमएच १९ एम ७३१) जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार साईदास चव्हाण हा गंभीर जखमी झाला. त्याला चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार घेतल्यानंतर अखेर चौकशीअंती बुधवार २० मार्च रोजी रात्री १० वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कारचालक दीपक उत्तम मोरे रा. चाळीसगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक भगवान माळी हे करीत आहे.

Protected Content