घाटातून जाणाऱ्या चालत्या ट्रकमधून पावणे पाच लाखांच्या मुद्देमालाची चोरी

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  रात्रीच्या अंधारात रावेर-पाल घाटात चालत्या ट्रक मधुन सुमारे पावणे पाच लाखाचा औषध फवारणीचा माल अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचे समोर आले आहे.

 

या बाबत वृत्त असे की, जयपुरवरुन अकोलाकडे जाणाऱ्‍या आयशर गाडी क्र (एमच १९ सीवाय ९८५१) कृषी लागणारे औषध फवारणी घेऊन पाल ते रावेर घाटातुन रात्री आठ ते नऊच्या सुमारास जात होता. यावेळी अज्ञात चोरटे गाडीवर चढून ताडपत्री फाडून ४ लाख ७५ हजार १६० रुपये किमतीचे १५ कृषी लागणारे औषध फवारणी खोके लांबवले आहे. ट्रक चालक आकाश राजपूत यांच्या फिर्यादीवरुन रावेर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन नवले करीत आहेत.

Protected Content