वडिलांपाठोपाठ मुलाचेही निधन ; उंटावद येथील घटना

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील उंटावद ग्रामपंचायतचे माजी सदस्य व दुध डेअरीचे विद्यमान संचालक सुधाकर उत्तमराव पाटील यांच्या पाठोपाठ त्यांच्या मुलाचेही निधन झाले आहे. सुधाकर पाटील यांचे ६ दिवसांपूर्वी निधन झाले आहे. 

तालुक्यातील उंटावद ग्रामपंचायतचे माजी सदस्य व दुध डेअरीचे विद्यमान संचालक सुधाकर उत्तमराव पाटील (वय ५४ वर्षे) यांचे शुक्रवार दि.२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता दिर्घ आजाराने निधन झाले. विशेष म्हणजे सहा दिवसापुर्वीच दि.२८ मार्च रोजी रात्री १०:३० वा.त्यांचे वडील उत्तमराव नारायण पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. ते ८७ वर्षांचे होते वडीलांचे निधन झाल्यानंतर अवघ्या ६ दिवसांनी मुलाचे निधन झाल्याने पाटील परिवारासह उंटावद गावावर दुःखाचा डोगंर कोसळला आहे. शेवटी नियतीचा खेळच अजब आहे व तो सर्वांना मान्य करावाच लागतो सुधाकर पाटील यांच्या पश्चातआई,दोनभाऊ,पत्नि,दोन मुले व सुन असा परीवार आहे ते गुलाबराव पाटील यांचे बंधू होत.

Protected Content