बाजारपट्ट्यातून शेतकऱ्याची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील म्हसावद गावातील बाजार पट्ट्यातून शेतकऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी बुधवारी ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक असे की, मनोज मोरसिंग चव्हाण (वय-३४, रा. लिहे तांडा ता.जामनेर) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. गुरूवार ५ ऑक्टोबर रोजी मनोज चव्हाण हे त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ एजे २०२२) ने कामानिमित्त जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील बाजार पट्ट्यात आलेले होते. त्यावेळी त्यांनी बाजार परिसरातील मोकळ्या जागेत दुचाकी पार्कींगला लावलेली होती. अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली.

सायंकाळी ५ वाजता मनोज चव्हाण हे दुचाकीजवळ आले असता त्यांना जागेवर दुचाकी मिळून आली नाही. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकीची माहिती मिळाली नाही. अखेर सात दिवसांनंतर बुधवारी ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर पाटील करीत आहे.

 

Protected Content