सुरभीतर्फे जिल्हास्तरीय भावगीत स्पर्धा उत्साहात संपन्न

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | सुरभी बहुद्देशिय महिला मंडळ जळगांवतर्फे आज रविवार, दि. १८ सप्टेंबर रोजी ब्राम्हण सभेत जिल्हास्तरीय भावगीत स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.

सुरभीतर्फे घेण्यात येणाऱ्या भावगीत स्पर्धेचे हे १८ वे वर्ष होते. सुरुवातीला स्पर्धेच्या परीक्षक प्रांजली रस्से, संपदा छापेकर, अध्यक्षा स्वाती कुलकर्णी, मंजूषा राव, विनया भावे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.

प्रथम सत्रात रोहिणी कुलकर्णी व मंजूषा राव यांनी सूत्रसंचालन केले; तर दुसऱ्या सत्रात अध्यक्षा स्वाती कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका सुचेता हाडा व कार्यक्रमाच्या अध्यक्षा रमा करजगावकर यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषकं प्रदान करण्यात आली.

स्पर्धेच्या प्रथम अर्थात बालगटात “स्वरश्री” चषक विजेती चैताली पंकज पाटील हिला प्रथम क्रमांक १ हजार रुपये व खुषी प्रवीण दायमास द्वितीय ७०० रुपये आणि कावेरी नितीन सुरुवाडकर हिला तृतीय क्रमांकचं ५०० रुपयाचं पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. तर तारका अनंत महाजन आणि ऐश्वर्या सचिन पिंगळे यांना प्रत्येकी २५० रुपयांचं उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आलं.

स्पर्धेच्या द्वितीय अर्थात मोठ्या गटात “स्वरश्री” चषक विजेती समृद्धी मिलिंद जोशी यांना १ हजार रुपये प्रथम क्रमांकाचं, प्रगती किशोर तांबट यांना द्वितीय ७०० रुपये आणि स्वाती मनोज महाजन यांना तृतीय क्रमांकाचं ५०० रुपयाचं पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. यासह वृषाली सचिन दुसाने आणि नाझनीन तबत्सुम शेख यांना प्रत्येकी २५० रुपयांचं उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आलं. स्पर्धेचं परीक्षण प्रांजली रस्से आणि संपदा छापेकर यांनी केलं.

या स्पर्धेत गाणाऱ्या गीतांना गोविंदराव मोकाशी यांनी हार्मोनियम संगत तर पांडुरंग पाटील यांनी तबला संगत केली. लहान गटास अॅड श्री बापूसाहेब परांजपे व मोठ्या गटास .अॅड अ.वा.अत्रे उत्तेजनार्थ शुभांगी श्रीरंग पुराणकर यांच्या स्मरणार्थ बक्षीसे व कमलाकर फडणीस यांच्याकडून प्रमाणपत्र देण्यात आले.

या स्पर्धेत पाचोरा, लासूर, फैजपूर, पळसखेडे, भुसावळ, कुसुंबा, शेंदुर्णी, जळगांव येथून  एकूण ५३ स्पर्धक सहभागी झाले होते. नुकतेच गणेशोत्सवात  गणपतीचे गाणे संगीत बद्ध केल्याबद्दल गोविंदराव मोकाशी व गाणे गायल्या बद्दल ऐश्वर्या परदेशी यांचा याप्रसंगी मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. संध्याकाळचे सूत्रसंचलन वैदेही नाखरे यांनी केलं. साधना दामले, सुनीता सातपुते, मेघा नाईक, अश्विनी जोशी, निलिमा नाईक, वैशाली कुलकर्णी, सविता नाईक, ज्योती भोकरडोळे, संजीवनी नांदेडकर, सचिन चौगुले, अभिमान तायडे यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.  

Protected Content