विवेक महाजन यांचा एनआयडी प्रवेशाबद्दल सत्कार

पाचोरा, प्रतिनिधी | तालुक्यातून एन. आय. डी‌. (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, भोपाल) मध्ये विवेक महाजन याने प्रवेश मिळवत पहिल्या विद्यार्थ्यांचा बहुमान प्राप्त केला आहे.

 

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित एम. एम.महाविद्यालयातून विवेक विनोद महाजन याने १२ वी विज्ञानपर्यंतचे शिक्षण घेतले. रंगश्री आर्ट फाऊंडेशन, ड्रॉईंग अँड पेंटिंग क्लासेस चा विद्यार्थी विवेक याने कलेच्या क्षेत्रातील गगन भरारी घेतली. भारतात एन. आय. डी‌. साठी अहमदाबाद, भोपाल, विजयवाडा, हरियाणा, आसाम या पाच ठिकाणी प्रवेश मिळतो. संपूर्ण भारतातून जवळपास ६० ते ७० विद्यार्थ्यांनाचं प्रवेश मिळतो. पाचोरा तालुक्यातून एन. आय. डी.साठी प्रवेशाची सुरुवात व्हावी हे सुबोध कांतायन सरांचे स्वप्न विवेक ने पूर्णत्वास नेले. विवेक ह्याने रवींद्रनाथ टागोर, सुप्रसिध्द क्रिकेटर सचिन तेंडुलकर एम. एस. धोनी, विराट कोहली, विनोद महाजन( वडील) अशी अनेक चित्रे त्याने साकारली आहेत.
‌ परधाडे येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विनोद महाजन यांचा तो सुपुत्र आहे. विनोद महाजन यांनी विवेक चे कलेचे गुण हेरून त्यास एन. आय. डी. साठी च्या निर्णयात महत्वपूर्ण साथ दिली.
‌ आपण गावातच राहूनही हे यश मिळविता येते व त्यासाठी कठीण परिश्रम, अभ्यास व चित्रकलेची संपूर्ण तयारी हेच या यशाची गुरुकिल्ली आहे. असे मनोगत विवेकने सर्व विद्यार्थ्यांसाठी केले आहे. मागील वर्षी आपल्या पी.टी. सी. संचलित एम. एम. महाविद्यालयाचा १२ वी विज्ञान शाखेचा तो विद्यार्थी होता. इयत्ता १० वीच्या परीक्षेतुन तो शाळेतून पहिला आला असतांनाही त्याने कलेचे क्षेत्र निवडले कारण काही तरी नवीन करण्याची त्यात उमेद होती.आणि ती त्याने पूर्ण केली आणि प्रवेश मिळवून दाखविला. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांनी त्याचा सत्कार केला व त्यास पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. सोबतच रंगश्री या संस्थेतून कला विश्वात असेच विद्यार्थी घडत राहो अश्या रंगश्री परिवाराला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Protected Content