दुदैवी घटना : मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या तरूणाचा नदीत बुडून मृत्यू

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गणपती विसर्जन करतांना लहान मुलगा पाण्यात बुडतांना पाहून वाचविण्यासाठी गेलेल्या तरूणाचा कांग नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना जामनेर-बोदवड रस्त्यावर घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केले जात आहे.

किशोर राजू माळी (वय-३०) रा. गणेश वाडी, जामनेर असे मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एकीकडे गणपती विसर्जनाचा कार्यक्रम सर्वत्र जल्लोषात केले जात आहे. दरम्यान, किशोर राजू माळी हा तरूण देखील गणपती विसर्जनासाठी कांग नदीपात्रात गेला होता. जामनेर-बोदवड पूलावर गणपती विसर्जन करत असतांना एका लहान मुलाला पाण्यामध्ये बुडतांना किशोरच्या लक्षात आले. क्षणाचा विलंब न करता किशोरने पाण्याचे उडी घेतली. दरम्यान, लहान मुलाला वाचविले. परंतू किशोरचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत किशोरच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरूष गेल्याने माळी परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Protected Content