ब्रेकींग : विसर्जनासाठी गेलेल्या मुलाचा डोहात बुडून मृत्यू

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील १७ वर्षीय मुलाचा पाण्याच्या डोहात गणपती विसर्जन करतांना बुडून मृत्यू झाल्याची घटना दुपारी २ वाजता घडली आहे. जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक गावात राहणारा सौरव शत्रुघ्न मोरे (वय-१७) हा आपला भाऊ व आई यांच्यासह वास्तव्याला आहे. लहान मुलाच्या गणपती मंडळात सौरवने भाग घेतला होता. दरम्यान, आज गणेश विसर्जनाच्या कार्यक्रम असल्याने तीन मित्रांसोबत अंबुजा कंपनीच्या मागे असलेल्या डोहात गणपती बुडविण्यासाठी गेला होता. सौरवने गणपती बुडविण्यासाठी पाण्यात उडील घेतली. यावेळी सोबत असलेले दोन मित्र डोहाच्या बाहेर उभे होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने सौरव मोरेचा पाण्यात बडून मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर दोन्ही मित्रांनी आरडाओरड केली. यावेळी खदानीच्या बाजूला काम करणाऱ्या कामगारांनी धाव घेतली होती. कामगारांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील ही दुसरी घटना असून जामनेर येथील कांग नदीत किशोर माळी या तरूणाचा एका मुलाला वाचविण्यासाठी प्रयत्न करत असतांना त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्याच्या पश्चात आई कल्पनाबाई, भाऊ भूषण असा परिवार आहे.

Protected Content