सेवानिवृत्त अधिकाऱ्याची ९ लाखात फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बँकेचे खाते बंद पडेल, अशी भीती दाखवून जळगाव शहरातील कोल्हेनगर येथील सेवानिवृत्त वृद्धाची तब्बल ९ लाख १९ हजार ९९५ रुपयात फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुरुवार, ८ सप्टेंबर रोजी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला

शहरातील कोल्हे नगर परिसरात सुभाष राजाराम पाटील (वय ६१,) हे परिवारासह वास्तव्यास आहेत. ते सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. दि. ६ सप्टेंबर रोजी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने सुभाष पाटील यांना खोटा व बनावट संदेश मोबाईलवर पाठवला. नंतर ८७६८२५१४६९ या मोबाईल नंबरवरून त्यांना फोन करत तुमचे बँकेचे खाते बंद पडेल, अशी भीती दाखवली. यानंतर खाते चालु ठेवण्यासाठी मोबाईलवर पाठवलेल्या संदेशात असलेल्या लिंकवर क्लीक करण्यास सांगितले. त्यात आधारकार्ड व पॅनकार्डची माहिती भरण्यास सांगितले. माहिती भरताच सुभाष पाटील यांच्या मोबाईलवर ओटीपी आला. तो संबंधिताचे विचारून सुभाष पाटील यांच्या बँक खात्यातून तब्बल ९ लाख १९ हजार ९९५ रुपये ऑनलाईन परस्पर काढून घेतले. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात ८७६८२५१४६९ आणि अन्य अज्ञात मोबाईल धारकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे हे करीत आहेत.

Protected Content