भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील गजानन महाराज नगरात बंद घर फोडून सोन्याचे दागिने असा एकुण ७० हजार रुपये किमतीचा ऐवज आज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजेश भास्कर पाटील (वय-५४) रा. गजानन महाराज नगर, कोटेजा हायस्कूल जवळ, भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. ९ डिसेंबर रोजी रात्री ८ ते १२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटातून सोन्याचे दागिने व भांडी असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर राजेश पाटील यांनी मंगळवार १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय सोनवणे करीत आहे.