हरीओम नगरातून पशूधनाची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कानळदा रोडवरील हरिओम नगरातून गाय व बछड्याची चोरी झाल्याचे समोर आले आहे. याबाबत मंगळवार १३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, संजय दगडू अंभोरे (वय-४८) रा. हरी ओमनगर, जुना कानळदा रोड, शिवाजीनगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. हातमजुरीचे काम करून उदरनिर्वाह करतात. शिवाय ते गाय व त्याचे बछडे याचे देखील पालन करतात. ४ डिसेंबर रोजी सकाळी ३ वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या समोर त्यांची गाय व बछडा बांधलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री गाय व बछडा यांची चोरी केल्याचे समोर आले. संजय अंभोरे यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला, परंतु त्यांच्या मालकीची गाय व बछडा कुठेही मिळून आले नाही. अखेर त्यांनी मंगळवार १३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून आज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश पाटील करीत आहे.

 

Protected Content