जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ जाहीर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ! पुण्यात होणाऱ्या राज्यस्तरीय आंतरजिल्हा खुल्या गटातील फुटबॉल स्पर्धेसाठी ७ दिवसाच्या प्रशिक्षण शिबिरामधून जळगाव जिल्ह्याचा २० खेळाडूंचा अंतिम संघ मंगळवारी १३ डिसेंबर रोजी दुपारी निवडण्यात आला. अशी घोषणा संघटनेचे सचिव फारुक शेख यांनी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे केली.

याप्रसंगी संघटनेचे सहसचिव अब्दुल मोहसीन, संचालक मनोज सुरवाडे, संघ व्यवस्थापक भुसावळ रेल्वेचे नितीन डेविड व प्राध्यापक डॉक्टर अनिता कोल्हे यांची उपस्थिती होती.

या संघात जेन स्पोर्ट्स अकॅडमीचे सुरज सपके, अर्पित वानखेडे, दीपक सस्ते, संजय कासदेकर, पवन सपकाळे, कौशल पवार व धनंजय धनगर, विनीत फुटबॉल क्लबचे पियुष मोजे, पंकज पाटील, पोलीस बॉईज अल्तमश खान व वसीम शेख, निखिल पाटील,अमेय तळेगावकर व निरज पाटील, वसीम शेख व अर्शद शेख, इरफान शेख, प्रतीक निळे, मोहम्मद बिलाल व पीटर डिसूजा, संघ व्यवस्थापक म्हणून भुसावळ रेल्वेचे नितीन डेव्हिड तर प्रशिक्षक म्हणून जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अब्दुल मोहसिन यांची निवड करण्यात आली.

Protected Content