दुचाकी अपघातात एक जण गंभीर जखमी

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील माऊली पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगाने येणारी दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला धडक दिल्याने एक जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवार ४ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता दुजाकीधारकावर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शरद प्रभाकर पाटील (वय-४६) रा. गणपती नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता ते कामाच्या निमित्ताने दुजाकीने जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे गेले होते. नशिराबाद गावाजवळील माऊली पेट्रोल पंपासमोर ते दुचाकी जवळ उभे होते. दरम्यान समोरून भरधाव वेगाने येणारी दुचाकी (एमएच १९ डीएफ ९२४१) ने शरद पाटील यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत शरद पाटील हे रस्त्याच्या पलीकडे पडल्याने त्यांच्या हात व पायाला गंभीर दुखापत झाली. दरम्यान ही घटना घडल्यानंतर दुचाकीधारक हा दुचाकी घेऊन पसार झाला होता. जखमी झालेल्या शरद पाटील यांना तातडीने खाजगी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. शरद पाटील यांच्या फिर्यादीवरून दुचाकीधार गिरीश अनिल सुलक्षणे रा. रथ चौक, जळगाव याच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात रात्री ८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार अलीयर खान करीत आहे.

Protected Content