धावत्या रेल्वेतून पडलेल्या “त्या” अनोळखी तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील असोदा रेल्वे गेटजवळ एका धावत्या रेल्वेतून अंदाजे ४० वर्षीय अनोळखी तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी ३ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली होती. जखमी तरूणावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी गुरूवारी ४ मे रोजी सकाळी ९ वाजता जळगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव ते आसोदा दरम्यान असलेल्या आसोदा रेल्वे गेटजवळ बुधवारी ३ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या धावत्या रेल्वेतून अंदाजे ४० वर्षीय अनोळखी तरूण खाली पडल्याची घटना समोर आली होती. यावेळी तरूण जखमी अवस्थेत पडून आल्याची माहिती रेल्वे कर्मचारी सुभाष सपकाळे आणि विकासकुमार यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने आसोदा गावातील गिरीष प्रदीप चिरमाडे आणि निखिल भानूदास चिरमाडे यांच्या मदतीने खासगी वाहनातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. अखेर उपचार सुरू असतांना गुरूवारी ४ मे रोजी सकाळी तरूणाची प्राणज्योत मालविली. याप्रकरणी जळगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content