कोरोना : जिल्ह्यात आज ३ बाधित रूग्ण आढळले; ९ रूग्णांची कोरोनावर मात !

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार आज दिवसभरात ३ संक्रमित रूग्ण आढळून आले आहे. तर ९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे. 

जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण मधून १ आणि भुसावळ तालुक्यातून २ असे एकुण तीन संक्रमित रूग्ण आढळले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ६३४ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ३१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २८ संक्रमित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आजपर्यंत २ हजार ५७५ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रान्वये कळविले आहे. 

Protected Content