घरफोडीतील 14 वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद

aropi news 2

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी करणारा फरात असलेला संशयीत आरोपीस अखेर 14 वर्षानंतर नागपूर येथून अटक केली आहे.

अजय उर्फ काल्या देविदास रामटेके रा. नागपूर असे या संशयित आरोपीचे नाव आहे. भुसावळ परीसरात घरफोडी केल्या प्रकरणी भुसावळ बाजार पोलीसात भाग 5 गुरनं 03/ 2005 प्रमाणे अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून हा संशयित आरोपी फरार होता. सदरील संशयीत आरोपी हा नागपूर शहरात नंदवन झोपडपट्टी भागात रहिवास करीत असल्याची खात्रीशीर मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांनी एक पथक तयार करून नागपूर येथे रवाना केले. नागपूर नंदवन पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या मदतीने संशयीत आरोपीस नंदवन झोपडपट्टी भागातुन अटक केली आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, भुसावळ भाग याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास पवार, पोना रमण सुरळकर, पोका विकास सातदिवे, ईश्वर भालेराव अशानी केली आहे.

Protected Content