मुंबई वृत्तसंस्था | कोरोनाच्या ओमायक्रॉन या व्हेरियंटचा देशात वेगानं प्रसार होतोय आ पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालं असून त्यानी महाराष्ट्रासह १० राज्यात मल्टिडिसिप्लिनरी टीम्स पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
देशात महाराष्ट्रासह बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोरम, कर्नाटक, आणि पंजाब या राज्यांमध्ये मल्टिडिसिप्लिनरी टीम्स येणार असून आरोग्य यंत्रणेसोबत ते काम करणार आहे. हे पथक तीन ते पाच दिवस थांबणार आहे.
हे पथक रोज संध्याकाळी ७ वाजता या राज्यातील कोरोनाविषयक घडामोडी व परिस्थितीचा सविस्तर रिपोर्ट करणार आहे. महाराष्ट्रात ओमायक्रॉन बाधितांची सर्वाधिक नोंद असून ओमायक्रॉनमुळे देशात आतापर्यंत एकाही जणाचा मृत्यू झालेला नाही.