भुसावळात लेवा पाटीदार समाजाचा परिचय मेळावा

भुसावळ, प्रतिनिधी | अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे लेवा पाटीदार समाजातील विवाहेच्छूक युवक – युवतीचे परिचय संमेलनाचे कुटुंबनायक रमेशदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले.याप्रसंगी विवाहेच्छूक युवक-युवतीचे कौटुंबिक व शैक्षणिक माहिती असलेली परिचय पुस्तिका प्रकाशन करण्यात आली.

 

संतोषी माता हॉल मध्ये आयोजित लेवा पाटीदार समाजातील विवाहेच्छूक युवक – युवतीचे परिचय संमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री एकनाथराव खडसे , आ.संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, नगरसेवक मुकेश पाटील , महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाशराव पाटील, औरंगाबाद मित्र मंडळाचे अध्यक्ष मधुकर सरोदे , उपाध्यक्ष राजेश सुधाकर चौधरी, प्रदेशाध्यक्ष प्रदीप भोळे, मा.नगरसेवक परीक्षित बऱ्हाटे, पुरुषोत्तम नारखेडे,महेश फालक,दिनेश पाटील, आरती चौधरी , दीपाली बऱ्हाटे, प्रवीण पाटील, आदी उपस्थित होते.

याप्रसंगी आपल्या मनोगतात एकनाथराव खडसे म्हणाले की, सुशिक्षित आणि संस्कारीत समाजात निकोप नाते संबंध विकसित होण्यासाठी स्नेह मेळाव्याची आवश्यकता असते. लेवा समाजाने सामूहिक विवाहाची प्रथा समाजात रुजविणे गरजेचे आहे. आपला समाज शिक्षणाने खूप मोठा झाला, मात्र शिक्षणाबरोबर आपण संस्कारही विसरू नये आणि अहं निर्माण होऊ देऊ नये. लेवा महासंघाने विवाहेच्छूक व शेतकरी वधू वर यांच्यासाठी स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करावे व सामूहिक विवाह पध्दतीचा अवलंब करून समाजाचा पैसा वाचवावा. तोच पैसा मुला मुलींचा संसार उभा करण्यास वापरावा असेही आवाहन एकनाथराव खडसे यांनी केले.लेवा समाजातील सर्व पोटजातींनी एकत्र येऊन समाजाच्या प्रगतीस हातभार लावावा. लेवा समाजाची देखणी भव्य वास्तू लवकरच स्वरूप घेईल असेही ते म्हणाले. या वास्तूच्या निर्मितीसाठी आ. संजय सवकारे व नगराध्यक्ष रमण भोळे यांनी जागा व निधी देण्याची घोषणा केली.

याप्रसंगी मा.आ. संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे ,माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, दिनेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वधु वर परिचय सूचीचे प्रकाशन करण्यात आले. या मेळाव्यास ५२ विवाहेच्छूक युवक युवतींनी आपला परिचय करून दिला. मेळाव्यास भुसावळ, मुक्ताईनगर,जळगाव, यावल, रावेर, औरंगाबाद, नाशिक, पुणे, मुंबई, सुरत, बडोदा, अहमदाबाद आदी ठिकाणाहून समाज बांधव उपस्थित होते. या परिचय मेळाव्यात आरती चौधरी यांनी विवाह ठरविताना समुपदेशनाची गरज आपल्या मनोगतातुन व्यक्त केली.

यशस्वीतेसाठी शहराध्यक्ष देवेंद्र वाणी, प्रदेश संघटक रुपेश चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष श्याम भारंबे, शुभम पाटील, नीरज किरंगे, गिरीश पाटील, अमोल महाजन, भालचंद्र चौधरी, कल्पेश पाटील, संकल्प वाणी, राहुल नेमाडे, निलेश राणे, सागर भारंबे, ओम वाणी, ऋतिक फालक, रुपेश पाटील, विशाल नारखेडे, निखिल रडे, आर्य चौधरी आदींनी कामकाज पहिले. सूत्रसंचालन व आभार प्रा.मुकेश चौधरी यांनी मानले.

Protected Content