एकता पतसंस्थेने बसविले उघड्या नळांना व्हॉल्व्ह ; लोकसहभाग वाढविण्याचे आवाहन

WhatsApp Image 2019 05 05 at 5.25.46 PM 1 1

 

जळगाव (प्रतिनिधी) शहरात गेल्या काही महिन्यांपासून पाणी टंचाईची जाणवत असून अनेक ठिकाणी उघडे नळ असल्याने लाखो लीटर पाणी वाया जात आहे. शहरातील एकता रिटेल किराणा मर्चंटस पतसंस्थेने प्लबिंग असोसिएशनच्या अध्यक्षांच्या मदतीने अनेक ठिकाणी मोफत नळ बसवून दिले. जळगावात पाणी बचतीसाठी सुरू केलेली ही मोहीम लोकसहभागातून मोठी चळवळ होईल, असा विश्वास यावेळी नागरिकांनी व्यक्त केला.

 

शहरात पाणी टंचाई असून अनेक ठिकाणी केवळ नळांना तोट्या नसल्याने लाखो लीटर पाणी वाया जात असल्याची बाब एकता पतसंस्थेचे अध्यक्ष ललित बरडीया व रतन टाक यांच्या लक्षात आली. पाणी बचत ही काळाची गरज असून त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे होते. त्यामुळे ललित बरडीया यांनी जळगाव जिल्हा प्लम्बिंग असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पाटील यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी स्वतः वैयक्तिकरित्या तात्काळ मदत करण्याचे आश्वासन दिले. रविवारी रतन टाक यांनी प्लंबर अमोल पाटील यांच्यासोबत जावून सुभाष चौक, दाणाबाजार, शनीपेठ, पोलनपेठ परिसरात तब्बल ४० उघड्या नळांना व्हॉल्व्ह नळ बसविले. यावेळी रजनीकांत लोटवाला, सुदर्शन बरडीया, नंदकिशोर चव्हाण, चंद्रकांत जावळे, उन्मेष बाविस्कर, देवेंद्र जांगडा, चंद्रकांत जांगडा, गुड्डू लोढा, विजय कांकरिया, नारायण जोशी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

 

लोकसहभागातून व्हावी लोकचळवळ

 

जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. सध्या तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. भविष्यात जर पाऊस कमी पडला तर नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागेल. त्यामुळे आतापासून प्रत्येकाने आपले कर्तव्य ओळखून स्वतःच आपल्या नळांना आणि इतरांच्या नळांना देखील तोटी अथवा व्हॉल्व्ह नळ बसवून घ्यावे. लोकांनी सहभाग वाढवला तर ही लोकचळवळ जळगावचे जलगावमध्ये रूपांतर करण्यात महत्वाची भूमिका बजावेल असे ललित बरडीया यांनी सांगितले.

Add Comment

Protected Content