कापसाच्या हमीभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील नेरी या गावांमध्ये एरंडोल चौफुलीवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यासाठी रविवारी २ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता जन आक्रोश करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

जामनेर तालुक्यातील नेरी येथे शेतकऱ्यांनी कापसाला १२ हजार रूपये प्रतिक्विंटल हमीभाव देण्यात यावा या मागणीसह इतर मागण्यांसाठी एरंडोल रोड चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन शेतकरी संजय मोगरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले आहे. आंदोलन करताना शेतकऱ्यांचा जन आक्रोश पाहायला मिळाला.जामनेर तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यात पहिल्यांदा शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे आंदोलन केले केले असून जर शासनाने याची दखल घेतली नाही तर मंत्रालयावर भव्य मोर्चा काढू असा इशारा लेखी निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांच्या कापसाला १२ हजार रुपये भाव मिळावा, शेतीला लागत असलेल्या खर्चावर भाव मिळावे, शेतीला लागणाऱ्या साहित्याची किंमत कमी करण्यात यावी, दिवसा वीज मिळावी यांच्यासह विविध मागण्या करण्यात आल्या असून याबाबतचे लेखी निवेदन नायब तहसीलदार प्रशांत निंबाळकर यांना देण्यात आले. यावेळी संजय मोगरे, उत्तम पाटील, अमोल पाटील, दीपक पाटील, विलास विधाटे, निवृत्ती बागुल, राहुल पाटील, रवींद्र सोनवणे, माणिक गवळी-पाटील यांच्यासह हजाराच्या संख्येने शेतकरी यावेळी उपस्थित होते.

Protected Content