मोठी बातमी : गिरीश महाजन यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जामनेरचे आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरीशभाऊ महाजन Girish Mahajan यांनी राजभवनात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या माध्यमातून अडीच वर्षांनी त्यांची कॅबिनेटमध्ये वापसी झाली आहे.

शिंदे सरकारचा आज विस्तार झाला. यात भारतीय जनता पक्षातर्फे गिरीशभाऊ महाजन Girish Mahajan यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. भारतीय जनता पक्षाच्या राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि डॉ. विजयकुमार गावित यांनी शपथ घेतल्यानंतर आ. गिरीश महाजन यांनी पाचव्या क्रमांकावर शपथ घेतली. तर गुलाबराव पाटील यांनी शिंदे गटातर्फे पहिल्या क्रमांकाने आणि एकूण सहाव्या क्रमांकाने आपल्या पदाची शपथ घेतली. त्यांना शपथ घेताच जिल्ह्यात ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे..

ना. गिरीशभाऊ महाजन हे १९९५ पासून सातत्याने विधानसभेवर निवडून येत आहेत. ते सहा वेळेस आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१४ ते २०१९ या कालावधीत त्यांनी राज्याचे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री म्हणून काम पाहिलेले आहे. यानंतर महाविकास आघाडीमुळे मधली अडीच वर्षे ते सत्तेबाहेर होते. आता मात्र त्यांची पुन्हा एकदा सत्तेत वापसी झाली आहे.

Protected Content