शासनाचा सावळा गोंधळ : ऐन वेळेस रद्द केला सामूहिक राष्ट्रगान कार्यक्रम

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्य सरकारने क्रांती दिनाला सकाळी ११ वाजता सामूहिक राष्ट्रगान म्हणण्याचा निर्णय ऐन वेळेला रद्द केल्याने राज्यात अभूतपूर्व गोंधळ उडाला आहे.

 

यासंदर्भातील वृत्त असे की, राज्य सरकारतर्फे क्रांती दिन म्हणजेच ९ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता ठिकठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार राज्यात शासकीय, निमशासकीय, शाळा, महाविद्यालय आणि खासगी संस्था या ठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत गायनाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र या आधीच म्हणजे साधारणता १०.३० वाजेच्या सुमारास राज्य सरकारने हा निर्णय रद्द केल्याचे परिपत्रक जारी केले आहे.

 

यासंदर्भात राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने परिपत्रक जारी केले असून यात आज आधी जाहीर झालेला सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. दरम्यान हा कार्यक्रम नेमका कशासाठी व का रद्द करण्यात आला याची कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. तर राज्यात ठिकठिकाणी हजारो ठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत गायनाचे नियोजन केले असतानाच हे परिपत्रक जारी करण्यात आल्याने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नेमके काय करावे हे समजण्याचे झाले आहे.

Protected Content