Home क्राईम दिग्दर्शक अनुराग कश्यपला ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी

दिग्दर्शक अनुराग कश्यपला ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी

0
106


New Project 49
 

मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील मॉब लीचिंगच्या घटना रोखण्यासाठी विविध क्षेत्रातील ४९ दिग्गज व्यक्तींनी पत्र लिहून चिंता व्यक्त केली होती. या दिग्गजांच्या यादीतील दिग्दर्शक अनुराग कश्यपने हे पत्र सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर त्याला एका ट्विटर युजरने जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

 

अनुराग कश्यपनं पत्र सोशल मीडियावर शेअर करताच एका ट्विटर युजर्सने ‘अलीकडेच मी माझी रायफल आणि बंदुकीची सफाई केली आहे आणि अनुराग आणि मी कधी समोरा समोर भेटतोय याची मी वाट बघतोय.’ असे म्हटले आहे. अनुरागने हे ट्वीट मुंबई पोलिसांना फॉरवर्ड केले आहे. यासंबधी सायबर पोलीस योग्य ती कारवाई करत असल्याचे मुंबई पोलिसांना म्हटले आहे. दरम्यान, याच्याआधी देखील कश्यपच्या मुलीला सोशल मीडियातून बलात्काराची धमकी देण्यात आली आहे.


Protected Content

Play sound