विविध मागण्यासाठी मराठा युवा संघातर्फे उषाराणींना निवेदन

ushharani

रावेर प्रतिनिधी । घोडसगाव ता. मुक्ताईनगर येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, शासनाने मराठा समाजाला याआधी दिलेले आरक्षण कायम करावे, अशा विविध मागण्यासाठी आज तालुका मराठा युवा संघातर्फे तहसीलदार उषाराणी यांना निवेदन दिले असून सकाळी 11 वाजता मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाला छोरीया मार्केट येथून सुरुवात करण्यात आली. तसेच निषेधाचे काळे टी-शर्ट परीधान करून ‘एक मराठा लाख मराठा’, ‘आरोपीला शिक्षा झालीच पाहीजे’ अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. दरम्यान रावेर विधासभा मतदार संघात मराठा समाजाचे मताधिक्य मोठ्या प्रमाणात आहे. आजच्या निघालेल्या मोर्चाकडे भाजपा, कॉग्रेस व वंचितकडून इच्छुक असलेले एकाही उमेदवारांची हजरी लावली नाही. तसेच तहसील कार्यालयामध्ये यावेळी पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

यावेळी उद्योजक श्रीराम पाटील, अनिल चौधरी, माजी सभापती निळकंठ चौधरी, प.स.सदस्य दीपक पाटील, योगेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते ललित चौधरी, सचिन पाटील, स्वप्नील पाटील, विनोद पाटील, प्रशांत पाटील, सूर्यभान चौधरी, अॅड.प्रवीण पाचपोहे, यादवराव पाटील, सीताराम पाटील, राजेंद्र चौधरी(राजू ठेकेदार) डॉ.राजेंद्र पाटील, डी.सी.पाटील, घनश्याम पाटील, डी.डी. वाणी, हर्षल पाटील, आत्माराम पाटील, हर्षल मराठे, देवेंद्र पाटील, चेतन पाटील व अमोल पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थितीत होते.

Protected Content