मुक्ताईनगर येथे विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान

 

मुक्ताईनगर,प्रतिनिधी । जागतिक महिला दिनानिमित्त मुक्ताईनगर शहरातील विविध क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा  प्रातिनिधीक स्वरूपात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

राजकीय, सामाजीक, वैद्यकीय, शालेय, महसुल, पोलीस प्रशासन, नगरपंचायत, पंचायत समिती, अंगणवाडी सेविका आशा सेविका, आरोग्य कर्मचारी, विविध क्षेत्रात आपलं अमूल्य योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा प्रातिनिधीक स्वरूपात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते अॅड. राहुल पाटील, युवाशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज कोळी, बाळा चिंचोले, निलेश काळे, सागर जाधव, अर्जुन कोळी, शुभम तायडे, योगेश सोनार, आकाश गोसावी आदी सामाजिक कार्यकर्ते हजर होते. यावेळी अॅड. रोहिणी खडसे, कीर्तनकार ह.भ.प.दुर्गा मराठे, उपनगराध्यक्षा मनीषा पाटील, महसूल कर्मचारी उज्वला सोनार, पोलीस कर्मचारी इंगळे मॅडम, डॉ. संजीवनी सरोदे, शिवसेना नगरसेविका सविता भलभले, आशासेविका भारती कैलास वंजारी , स्टॅम्प वेंडर संध्या हिरोळे,  मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयातील सर्व परिचारिका आदींचा सत्कार करण्यात आला.

 

Protected Content