जवखेडा येथे विविध विकासकामांचे भूमिपुजन

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एकीकडे सत्तापालट होत असताना आमदार अनिल पाटील यांनी आपल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून विकासकामांची पायाभरणी करण्याचे नियोजन केले. जवखेडा येथे तब्बल 1 कोटी 64 लाखांच्या पाणीपुरवठा योजनेसह इतर विकास कामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला.

यावेळी प्रामुख्याने जलजीवन मिशन अंतर्गत 1 कोटी 64 लक्षची नवीन पाणीपुरवठा योजना आणि 40 लक्ष निधीतून जवखेडा ते मोहाडी रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.गावात आगमन होताच ग्रामस्थांनी आमदारांचे जल्लोषात स्वागत करत जंगी सत्कार केला.यावेळी आपल्या मनोगतात बोलताना आमदार अनिल पाटील म्हणाले की जवखेडा गावाने आपल्याला नेहमीच विशेष प्रेम दिले असल्याने विकासकामांच्या रूपाने त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न मी करीत आहे,हे गावच नाही तर आपला संपुर्ण मतदारसंघच विकासाच्या दृष्टीने परिपुर्ण झाला पाहिजे हाच आपला प्रयत्न आहे,त्यादृष्टीनेचे आपली वाटचाल असताना कोरोना महामारी असो किंवा सत्तापालट संदर्भातील अडचणी असो त्या साऱ्या आपल्या समोर आहेत,तरीही आपल्याला चिंता करायची गरज नाही आपल्या हक्काचे जे जे असेल तें मिळविल्याशिवाय आपण स्थस्थ बसणार नाही,महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांना या सरकारने स्थगिती दिली असली तरी लवकरच ती स्थगिती उठून मंजूर झालेली सारी कामे आपल्याला मिळतील त्यात जास्तीतजास्त गावांचे हित साधले जाईल असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

या कामाचे झाले भूमिपूजन

2515 अंतर्गत स्मशानभुमी बांधकाम करणे, रक्कम रु. 12 लक्ष,आमदार निधीतुन- दत्त शिखर मंदिराजवळ कॉक्रिटिकरण करणे,रक्कम रु. 7 लक्ष, ग्राम पंचायत विभाग- सुविधा केंद्र बांधणे रक्कम रु. 7 लक्ष, डी.पी.सी अंतर्गत जवखेडा ते मोहाडी रस्ता डांबरीकरण करणे रक्कम रु.40 लक्ष आणि डी.पी.सी. तथा जलजिवन मिशन अंतर्गत गावाला 1 कोटी 64 लक्ष निधीतून पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू करणे.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष सुरेश पाटील,जवखेडा सरपंच अर्चना पाटील, उपसरपंच प्रशांत पाटील, लता पाटील, चुडामण पाटील, जिजाबराव पाटील, दिनकर पाटील, चारुशिला पाटील, जयश्री माळी, सर्जाबाई भिल, जिजाबराव भिल, विमालबाई भिल, विठोबा भिल, लटकन पाटील, जे. व्ही. पाटील,  शामकांत पाटील, प्रकाश पाटील, पंडीत पाटील, सुरेश पाटील, बापु पाटील, सुरेश पाटील, चंद्रभान पाटील, प्रकाश पाटील, मच्छीन्द्र पाटील यांच्या सह ग्रामस्थ मंडळ, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.आवश्यक विकासाकामांसह जलजीवन मिशन अंतर्गत मोठी पाणीपुरवठा योजना मिळाल्याने ग्रामस्थांनी आमदारांचे विशेष आभार व्यक्त केले!

 

Protected Content