अधिकारी माझे ऐकत नाही ; ना. महाजन यांचे दुष्काळ पाहणी दौऱ्यात धक्कादायक विधान


नाशिक (वृत्तसंस्था) पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला. यावेळी शासाकडून मदतीचा आशा शेतकरी बाळगून होते.परंतु तलाठ्यांपासून प्रांताधिकाऱ्यांसह अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या या दौऱ्याकडे अक्षरश: पाठ फिरवली. त्यावर ‘अधिकारी माझे ऐकत नाहीत’ असे धक्कादायक विधान ना. महाजन यांनी करत एकप्रकारे शेतकऱ्यांच्या जखमेवर एकप्रकारे मीठच चोळलेय.

 

 

महाजन यांनी नाशिक जिल्ह्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याचा सिन्नर तालुक्यातून प्रारंभ केला. तालुक्यातील भोकणी, पांगरी, वावी व पंचाळे या दुष्काळी गावांना भेटी दिल्यानंतर शेतकरी व ग्रामस्थांनी अक्षरश: तक्रारींचा पाऊस पाडला. मात्र सोबत अधिकारी व कर्मचारी नसल्याने जनतेने मांडलेल्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी पालकमंत्र्यांना दरवेळी मोबाइलवर अधिकाऱ्यांशी बोलावे लागायचेय. आचारसंहितेचे कारण सांगत, अधिकारी बैठकीला येत नसल्याचा अजब दावा करत, महाजन यांनी दुष्काळाचे खापर अधिकाऱ्यांवर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. महाजन यांच्या दाव्याची आता शेतकऱ्यांकडून खिल्ली उडवली जात आहे.

 

 

नाशिक जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळाची तिव्रता आहे.जिल्ह्यात २६३ टँकरद्वारे नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविले जात आहे.तर जनावरांचेही चाऱ्या अभावी तीव्र हाल आहेत.त्यामुळे दुष्काळी भागाच्या पाहणी दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या दौऱ्याकडे शेतकरी आस लावून होते.महाजन आपल्या दौऱ्यात दुष्काळाबाबत काही तरी ठोस उपाययोजना करतील अशी अपेक्षा होती.परंतु अधिकाऱ्यांकडून आचारसंहितेचा बागूलबुवा करत असल्याचे सांगत,अधिकारी आमचे ऐकत नाहीत असे धक्कादायक विधान केले.या दौऱ्यात अधिकारी आले नसल्याचे सांगत,हा आमचा खाजगी दौरा असल्याचा दावा महाजन यांनी शेतकऱ्यांसमोर केला. त्यावर तुम्ही आमच्या दु:खावर फुंकर घालू शकत नसाल तर,आमचा तळतळाट कोणासमोर मांडायचा? असा सवाल यावेळी शेतकऱ्यांनी केला.आम्ही फक्त मते देण्यासाठीच आहोत का असा सवाल करत,अधिकारी ऐकत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणीही यावेळी केली. दरम्यान, अधिकारी दौऱ्यात नव्हते. मात्र भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

Add Comment

Protected Content