रायपूर-नागपूर मार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | छत्तीसगड राज्यातील रायपूरवरून नागपूरकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात झाला. ही घटना मोहघाटा जंगलात महामार्गाचे काम सुरू असलेल्या भागात घडली यात बसमध्ये ३८ प्रवासी प्रवास करत होते. या घटनेत बसमधून प्रवास करत असलेले धर्मेंद्र शिवकुमार कोसले (वय ३६,रा. खापरीकला), धर्मेंद्रची पत्नी गंगोत्री (वय ३४) यांच्यासह आणखी एक प्रवासी असे तिघे जण जखमी झाले आहेत.

जखमींना साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.त्यांना किरकोळ जखमा आल्याने ते आता सुखरूप आहे. या ठिकाणी अन्य एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रॅव्हल्स (क्रमांक सीजी ०८/एयू ५४००) खोदलेल्या शोल्डर खड्ड्यात उलटली. ही घटना आज मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास वाजता घडली आहे. ही बस मध्यरात्री साकोलीवरून लाखनीकडे रवाना झाली. तेली नाला जंगल परिसरात वन्यप्राण्यांसाठी अंडर पासचे बांधकाम सुरू आहे. साकोली पोलिसांनी बस चालक मुनीर खान यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

Protected Content