मस्करी केल्याच्या कारणावरून तरुणाला बेदम मारहाण

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील गोजोरा गावात मस्करी केल्याच्या कारणावर एका तरुणाला चार जणांनी बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमोल राजू तारुळकर वय-27 रा. गोजोरा ता. भुसावळ हा तरुण आपल्या परिवारासह आहे. रविवार ७ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता घरी असताना मस्करी केल्याच्या कारणावरून गावात राहणारे धनंजय शिवदास सपकाळे, शिवदास रामदास सपकाळे, सुषमा शिवदास सपकाळे आणि रामदास संपत सपकाळे या चार जणांनी अमोल याला शिवीगाळ करत लाकडी काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी सोमवारी ८ एप्रिल रोजी दुपारी एक वाजता मारहाण करणारे धनंजय शिवदास सपकाळे, शिवदास रामदास सपकाळे, सुषमा शिवदास सपकाळे आणि रामदास संपत सपकाळे यांच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कैलास बाविस्कर हे करीत आहे.

Protected Content