केंद्र सरकारने कश्मीर येथील या संघटनेवर घातली बंदी

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | केंद्र सरकारने मुस्लिम लीग जम्मू-कश्मीर-मसरत आलम गटावर (एमएलजेके-एमए) बंदी घातली आहे. सरकारने ही कारवाई बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायदा (यूएपीए) अंतर्गत केली आहे. संघटनेचे सदस्य जम्मू-कश्मीर मध्ये दहशतवादी कार्यवाईत सहभागी होते आणि दहशतवादी गटांना पाठिंबा देत होते असा आरोप या संघटनेवर करण्यात आलेला आहे. ही माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले मुस्लिम लीग जम्मू कश्मीर मसरत आलम गट (एमएलजेके-एमए)  या संघटनेला (यूएपीए) अंतर्गत ‘बेकायदेशीर संघटना’ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. ही संघटना आणि त्याचे सदस्यांचा जम्मू-काश्मीरमधील देशविरोधी आणि अलगवादी कार्यवाहीत सहभाग आहे. जम्मू-कश्मीरमध्ये इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्यासाठी ते दहशतवादी संघटनांचे समर्थन करतात आणि स्थानिक लोकांना भडकावतात.

आपल्या देशाची एकता, सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या विरोधात कोणीही कृत्य केल्यास त्यांना सोडले जाणार नाही आणि कायद्याच्या पूर्ण रोषाला सामोरे जावे, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा संदेश मोठा आणि स्पष्ट आहे, असे देखील अमित शाह यांनी ठणकावून सांगितले.

Protected Content