अखेर महिन्याभरात अकलुद-दुसखेडा दरम्यानचा रस्ता होणार तयार

यावल-लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील अकलुद-दुसखेडा दरम्यान असलेला रस्त्यासाठी निधी उपलब्ध होऊनही गेल्या तीन वर्षांपासून ते अपूर्णावस्थेत पडून आहे. परिणामी सरपंच व ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर महिनाभरात सदर रस्ता तयार करण्यात येईल असे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर याची सांगता करण्यात आली.

तालुक्यातील अकलुद ते दुसखेडा या मार्गावरील रस्त्याच्या कामासाठी जवळपास दिड कोटींचे निधी मंजुर झाले आहे. असे असतांना संबधित सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या वेळ काढु पणामुळे मागील तिन वर्षापासुन सदर रस्त्याचे काम हे अपूर्णावस्थेत पडून आहे. यामुळे रस्त्याशी जोडलेल्या जवळपास वीस गावांच्या नागरीकांना वाहनाने होणाऱ्या अपघातांसह अनेक समस्या व अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटील, राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांच्या नेतृत्वाखाली दुसखेडा व परिसरातील विविध गावांच्या सरपंच व ग्रामस्थांच्या उपस्थितीत यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालया समोर प्रशासनातील अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी सुमारे चार तास ठीय्या आंदोलन करण्यात आलेत.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी जे. एस. तडवी व बांधकाम अभीयंता अजीत निंबाळकर यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी तडवी यांनी आंदोलनकर्त्यांना एक महीन्याच्या आत संपुर्ण रस्त्याचे काम पुर्ण होइल असे लिखित स्वरूपात आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले .

या आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील,आदीवासी विभागाचे एम. बी. तडवी ,वसंत पाटील , नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष राकेश कोलते , माजी उपनगराध्यक्ष शेख असलम शेख नबी, मोहसीन खान, आबिद कच्छी, माजी नगरसेवक हाजी अकबर खाटीक, बापु जासुद, समाधान पाटील ,अन्वर खाटिक, कामराज घारू, ललित पाटील, हाजी युसुफ शेख ,राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त, दुसखेडा व इतर परिसरातील कासवा गावांचे सरपंच राहुल इंगळे, सदस्य श्रीराम सपकाळे, दुसखेडा ग्रामपंचायत उपसरपंच विवेक सोनवणे, ग्राम पंचायत महेन्द्र बाऱ्हे ,याकुब तडवी , विनोद पाटील यांच्यासह विविध ग्रामपंचायत सदस्य सह ग्रामस्थांनी सहभाग घेतला .

Protected Content