यावल येथील डॉ. झाकीर हुसैन उर्दू हायस्कूलचा ८९ टक्के निकाल

यावल प्रतिनिधी । शहरातील डॉ. झाकीर हुसैन उर्दू हायस्कूल व ज्यूनियर कॉलेजने बारावीच्या निकालात ८९ टक्के गुण मिळाले. यात विज्ञान शाखेचा ९८.३० टक्के तर कला शाखेच निकाल ७१.९५ टक्के निकाल लागला आहे.

नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलीत डॉ. झाकीर हुसैन ऊर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या बारावीच्या शालांत परीक्षेचा आज ऑनलाईन निकाल जाहीर झाला. यात विद्यालयातील सायन्सचा ९८.३० टक्के तर कला विभागाचा ७१.९५ टक्के निकाल लागला आहे. विज्ञान विभागातून सानिया कौसर रियास खान ही ८५.८४ टक्के मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली तर कला शाखेतून कानीज फातिमा शेख बद्रुद्दिन ७८.७६ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे संस्थेचे अध्यक्ष हाजी शेख ताहेर शेख चाँद, संचालक मंडळ, विद्यालयाचे चेअरमन हाजी शेख ईब्राहीम शेख चाँद, विद्यालयाचे प्राचार्य रहीम रजा यांच्यासह सर्व शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग यांनी कौतुक करून त्यांच्या भावी शैक्षणीक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

Protected Content