कोरपावली संदल व उर्स साध्या पद्धतीने साजरी; कव्वाली कार्यक्रम रद्द

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील आदीवासी परिसरातील प्रसिद्ध असलेली व अनेक वर्षांपासून हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक ओळख असलेले हजरत पीर गैबनशाह वली बाबा यांच्या दर्गाह शरीफच्या उर्स यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे.

रावेर, यावल, चोपडा या तिनही तालुक्यातून हजारोच्या संख्येने सर्वधर्मीय भावीक पीर बाबांच्या दर्शनार्थ कोरपावली गावात येतात, या उर्सच्या निमित्ताने यात्रेच्या परंपरानुसार भारतातील सुप्रसिद्ध कव्वाल याकलाकारांचा कव्वालीचा सांस्कृतीक मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असते, परंतु या वर्षी सम्पूर्ण जगावर कोरोना विषाणु संसर्गाच्या महामारीचे संकट उभे राहिले असतांना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने उपाययोजना म्हणुन विविध नियोजन आखले असल्याने या नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी यंदा होणारी यात्राच्या निमित्ताने मागील पन्नास वर्षाची परंपरा खंडीत करीत यावेळेस आयोजीत कव्वालीचा सांस्कृतीक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.

शासनाच्या वतीने दिलेल्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सन राहावे व श्यासानाच्या नियमांचे उल्लंघन होऊनये या उद्देशाने कोरपावली गावातील हिंदू मुस्लिल पंच कमिटीच्या वतीने दि १३जानेवारी बुधवार या दिवशी अगदी साध्या पद्धतीने पिरबाबांच्या दर्गाहवर चादर व फुल अर्पण करून भाविकांनी शांततेने दर्शन घेऊन आंनद घ्यावा असे आव्हान शांताराम चिधु महाजन, मुक्तार पिरण पटेल, दीपक चुडामन नेहेते, निशिकांत झाम्बरे, राजेश फेंगडे, माजी सरपंच जलील सत्तार पटेल, भिकारी आमद तडवी,गफ्फार नामदार तडवी, म्हैबु मुजात तडवी, नारायण अडकमोल , इस्माईल नबाब तडवी, अजित समशेर तडवी , डॉ . राजू पटेल व गावातील सर्व हिन्दु मुस्लीम ग्रामस्थ यांनी आवहान केले आहे.

Protected Content