फेक न्यूजला रोखण्यासाठी केंद्राने स्थापन केला फॅक्ट चेक युनिट

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सोशल मीडीयावर डिजिटल माध्यमांवर खोटया बातम्या, अफवांना रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाने (पीआयबी) फॅक्ट चेक यूनिट स्थापना केली आहे. त्यांची पीआयबीचा हा यूनिट सोशल मीडीयावरील वेबसाईटची निगराणी करेल. आणि फेक बातमी असल्यास पीआयबी संबंधित वेबसाईटच्या संचालकांना नोटीस पाठवले. त्यांना हया खोटया बातम्या हटवण्यास सांगू शकेल. हे बातम्या किंवा आशय न हटवल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

केंद्र सरकारविरोधातील अपप्रचार रोखून तथ्य तपासणी करण्याच्या उद्देशाने हा युनिट काम करणार आहे असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. सरकारविरोधात काही चुकीच्या, संभ्रम करणाऱ्या बातम्या वाटल्यास फेसबुक, गुगल,टि्वटर (एक्स) वर असल्याच पीआयबी त्याची तथ्य तपासणी करेल.

Protected Content