ब्रेकींग : देहव्रिकी व्यावसायावर पोलीसांचा छापा; ५० पिडीत महिलांची सुटका; ११ जणांना अटक

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरातील नगरपरिषदेच्या मागे असलेल्या एका पत्राच्या शेडमध्ये देहविक्री करणाऱ्या व्यवसायिकांवर पोलिसांनी छापा टाकून तब्बल ५० पीडित महिलांची सुटका करण्यात आली यात एकूण ११ जणांविरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी गुरुवारी २१ मार्च रोजी दुपारी २ वाजता पत्रकार परिषदेत दिली.

चोपडा शहरातील नगरपालिका नगरपरिषदेच्या मागे असलेल्या वार्ड क्रमांक ३४ मध्ये बेकायदेशीररित्या पत्राच्या शेडमध्ये देहविक्रीचे व्यवसाय करून कुंटणखाना चालवीत असल्याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकासह बुधवारी २० मार्च रोजी सायंकाळी ७३० वाजेच्या सुमारास बनावट ग्राहक तयार करून देहविक्रीच्या ठिकाणी पाठविला. दरम्यान कुंटणखाना चालवीत असल्याबाबत खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह पथकाने छापा टाकला. यामध्ये ११ महिला आरोपींना पोलिसांनी अटक केली तर तब्बल ५० पिडीत महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत महिलांना आशादीप सुधारगृह येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, सपोनि प्रशांत खंडारे, पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, पोउनि अनिल भुसारे, योगेश्वर हिरे, स.फौ. जितेंद्र सोनवणे, पोहेकॉ विलेज सोनवणे, पोहेकॉ दीपक विसावे, हरिश्चंद्र पवार, शेषराव तोरे, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, महेंद्र साळुंखे, सुभाष सपकाळ, संदीप भोई, महिला पोहेकॉ विद्या इंगळे, शुभांगी लांडगे, रत्नमाला शिरसाट, पोकॉ रवींद्र पाटील, लव सोनवणे, प्रकाश मथुरे, प्रमोद पवार, रवींद्र बोरसे, मदन पावरा, विजय बच्छाव, मपोकॉ अनिता हटकर यांनीही कारवाई केली आहे.

Protected Content