भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील सावदे शिवारातील केटीवेअर येथील पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या एका ४२ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह तीन दिवसांनी वाक शिवारातील नदीतील झुडूपात आढळून आला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. युवरात लालचंद सोनवणे वय ४२ रा. गुढे ता.भडगाव असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील गुढे गावात युवराज सोनवणे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २७ सप्टेंबररोजी सावदे शिवारातील केटीवेअर पाण्यामध्ये युवराज सोनवणे हे वाहून गेले होते. त्यांचा शोध सुरू असतांना ३० सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास त्यांचा मृतदेह वाक शिवारातील नदीतील एका झुडूपात आढळून आला. हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर मयत युवराज सोनवणे यांचा मुलगा समाधान सोनवणे यांने मृतदेहाची ओळख पटविली. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहे.