पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यातील मुंदाणे प्र ऊ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजकुमार दगडू पाटील यांची बिनविरोध निवड संपन्न झाली. यावेळी आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच नितीक्षा पाटील होत्या.त्यांना ग्रामसेवक वासुदेव मारवडकर यांचे सहकार्य लाभले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पूजा पाटील, शरद पाटील, सुलाबाई पाटील, माधवी पाटील, ज्ञानेश्वर बहिरम, जिजाबाई भिल उपस्थित होते.
राजकुमार पाटील यांचे माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील,जि प सदस्य रोहन पाटील,माजी सरपंच हिरामण पवार,डी के पाटील,एकनाथ पाटील, विकासो चेअरमन आधार नाथबुवा, पोलीस पाटील अशोक पाटील यांच्यासह सर्व माजी सरपंच उपसरपंच,सदस्य व ग्रामस्थांनी अभिनंदन केले. आपल्या उपसरपंच पदाच्या कालावधीत गावातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राजकुमार पाटील यांनी यावेळी सांगितले.