खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी भुसावळातून ताब्यात

bhusaval aaropi

भुसावळ, प्रतिनिधी | दोन वर्षांपूर्वी शहरात एका तरुणाचा खून केल्यानंतर जामिनावर सुटला असता फिर्यादी व साक्षीदारांना मारहाण व शिवीगाळ करून फरार झालेल्या आरोपीस आज (दि.७) येथील बाजारपेठ पोलिसांनी शहरात आला असताना ताब्यात घेतले आहे. येथील न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून त्याला जळगाव येथे पाठवले आहे.

 

अधिक माहिती अशी की, ५ सप्टेंबर २०१७ रोजी रात्री ९.०० च्या सुमारास राजेंद्र ऊर्फ गोलु ऊर्फ गणेश सुभाष सावकारे (वय-२३) रा.तुळजाभवानी मंदिर, न्यु ऐरीया याने ललित ऊर्फ विक्की हरी मराठे (वय-२२) याचा खुन केला होता. त्याला लागलीच अटक करण्यात आली होती. २०-१२-२०१७ रोजी या गुन्हयात त्याला जामीन मिळाला होता. जामीन मिळाल्यानंतर आरोपीने १७-०४-२०१८ रोजी या गुन्हयातील फिर्यादी व साक्षीदारांना मारहाण व शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यावर पुन्हा गुन्हा दाखल होवून त्याला अटक झाली होती. त्याला २१-०४-२०१८ रोजी जमीन मिळाला असता त्याविरोधात फिर्यादी व साक्षीदार यांनी औरंगाबाद खंडपीठात जामीन रद व्हावा म्हणुन याचिका दाखल केली होती. त्यांची विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीचा जामीन २८-०८-२०१८ रोजी रद्द केला व खुनाच्या गुन्हयात पकड वारंट निघाले तेव्हापासुन आरोपी राजेंद्र सुमारे एक वर्ष नऊ दिवसांपर्यंत फरार होता. तो ०६-०८-२०१९ रोजी शहरातील नँशनल हायवे क्र ६ लगत असलेल्या गुरुकुल कडे आला असल्याची गुप्त माहीती मिळाल्याने बाजारपेठ पो.स्टे चे पो.ना.दिपक जाधव, पो.काँ कृष्णा देशमुख, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी यांनी लागलीच तेथे जावुन त्याला ताब्यात घेतले व पो.स्टे ला आणले. तसेच आरोपीस आज (दि.७) येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची जळगाव येथे न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

Protected Content