बदलीविरोधात मद्रास हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांचा राजीनामा

VIJAYA

 

चेन्नई (वृत्तसंस्था) मद्रास हायकोर्टाच्या न्यायमूर्ती विजया के ताहिलरमानी यांनी बदलीच्याविरोधात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.

 

सुप्रीम कोर्टाच्या कॉलिजीअमने त्यांची बदली मेघालय उच्च न्यायालयात केली होती. त्याच्याविरोधात विजया ताहिलरमानी यांना आपला राजीनामा राष्ट्रपती कोविंद यांच्याकडे पाठवला. राजीनाम्याची एक प्रत सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. 28 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील कोलॅजियमने मेघालय हायकोर्टाचे न्यायमूर्ती एके मित्तल यांची मद्रास हायकोर्टात बदली केली होती. तर न्यायमूर्ती ताहिलरमानी यांची बदली मेघालय हायकोर्टात केली. सुप्रीम कोर्टाच्या कोलॅजियममध्ये न्यायमूर्ती एसए बोबडे, एनवी रमणा, अरुण मिश्रा आणि आरएफ नरीमन यांचा समावेश आहे.

Protected Content