पुरग्रस्तांसाठी मदत गोळा करणाऱ्या विद्यार्थिनींवर बलात्काराचा प्रयत्न

 

Rape Child crime

 

सोलापूर (वृत्तसंस्था) कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी मदतनिधी गोळा करताना दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर बलात्कार करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना सोलापूर शहरातील जेलरोड भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

 

कोल्हापूर, सांगलीतील पुरग्रस्तांना मदत गोळा करण्याच्या सूचना सोलापूर शहरातील काही शाळांनी विद्यार्थ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार पीडिता आणि तिची मैत्रिण पुरग्रस्तांना मदत गोळा करत होत्या. पीडित मुलगी व तिची मैत्रिण जेलरोड परिसरातील एका कारखान्यामध्ये मदत मागण्यासाठी गेली. यावेळी आरोपी लक्ष्मण ज्ञानोबा बड्डू याने दोन्ही मुलींना जिन्याच्या पायऱ्यांवरजबरी नेत त्याच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. परंतू एका मुलीने हिंमत दाखवीत पेनाच्या टोकाने आरोपीच्या चेहऱ्यावर वार करून घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर घरी गेल्यानंतर आपल्या आई-वडिलांना झालेला प्रकार सांगितला. या प्रकरणी जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी लक्ष्मण बड्डूला अटक करण्यात आली असून कोर्टाने त्याला 9 सप्टेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Protected Content