इंधनाच्या दर किमान ५ ते ७ रुपये घट

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | केंद्र सरकारने अबकारी दरात कपात केल्याने इंधनाचे दर कमी झाले आहेत. पेट्रोल आणि डीझेल मध्ये किमान ५ ते ७ रुपये दर कमी झाले असल्याने जिल्हावासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात तसेच राज्यात गेल्या चार ते पाच महिन्यापासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत होती. त्यातच रशिया आणि युक्रेनच्या आपसातील युद्धामुळे परदेशातुन आयात होणाऱ्या कच्च्या तेलाचे देखील दर वाढत असल्याने त्याचा परिणाम पेट्रोल डीझेल दरवाढीवर झाला होता.

गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये  ८० ते ९० रुपये पर्यंत असलेले पेट्रोलचे दर २१ मे पर्यंत सुमारे  १२१ रुपयांपर्यत पोचले होते. इंधनाचे दर रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी आणि अन्य घटकावर अवलंबून आहेत. त्यामुळे जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. त्याचा वाहतूक व्यवस्थेवर आणि पर्यायाने बाजारपेठेवर होऊन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर देखील दिसून येतात.
केंद्र सरकारने आवाहन केल्यानुसार बहुतांश राज्यांनी इंधनाचे दर गेल्या महिन्यात कमी केले होते. त्यामुळे महाराष्टापेक्षा अन्य राज्यात इंधनाचे दर १० ते १२ रुपयानी कमी होते. नुकतेच केंद्र सरकारने अबकारी दरात कपात केल्यामुळे राज्यात तसेच जळगाव जिल्ह्यात इंधनाचे दर किमान ५ ते ७ रुपयांनी कमी झाले आहेत.
नाशिक विभागात पेट्रोल आणि डीझेलचे दर याप्रमाणे आहेत.
जिल्हा पेट्रोल डीझेल
जळगाव   १११.४४     ९५.९२
धुळे         १११.८०     ९६.२७
नंदुरबार    ११२.५२    ९६.९६
नगर        १११.५८    ९६.०५
नाशिक     १११.८३    ९६.२९
मुंबई शहर १११.३५    ९७.२८

Protected Content