भयंकर : अल्पवयीन मुलीला पळवून नेत तीन दिवस अत्याचार

नराधमाला रावेर पोलीसांकडून अटक; रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणारी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला पाळून नेत तिच्यावर शेतात सतत तीन दिवस अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधमाला अटक करण्यात आली आहे.

 

जीवन सुधाकर पाटील (वय-२१ ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील एका गावात पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जीवन सुधाकर पाटील (वय-२१) याने अल्पवयीन मुलगी घरी एकटी असतांना तीला फूस लावून दुचाकीवर पळून नेत शेतातील झोपडीत ठेवून सतत तीन दिवस तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार समजल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तातडीने रावेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. रावेर पोलीस ठाण्याचे महिला पोलीस कर्मचारी याच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी जीवन पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक दिपाली पाटील करीत आहे.

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.