जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मयत झालेल्या महिलेची ओळख पटली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनोळखी महिलेचा शनिवारी १६ जुलै रोजी सकाळी ६ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तिची ओळख पटली असून पिंप्री सेकम दिपनगर ता. भुसावळ येथील रहवासी आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

मीनाबाई अरूण तायडे (वय-४५) रा. पिंप्री सेकम दिपनगर, ता. भुसावळ असे मृत महिलेचे नाव आहे.

 

अधिक माहिती अशी की, गेल्या महिन्यात १७ जूनला रोजी भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथे अनोळखी महिला बेवारसरीत्या पडलेल्या स्थितीत आढळून आली होती. त्यामुळे महिलेला शासकीय रुग्णालयातून जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारात दाखल करण्यात आले होते. दरम्यान शनिवारी १६ जुलै रोजी सकाळी ६ वाजता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

 

मयत महिलेची ओळख पटविण्यासाठी रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक विजय खैरे, पोलिस नाईक रेवानंद साळुंखे, पोहेकॉ नीलेश पाटील, पो.कॉ.  पंकज पाटील, अजय सपकाळे यांनी तपासाची चक्रे फिरवून १२ तासात ओळख पटविली. मीनाबाई अरूण तायडे (वय-४५) रा. पिंप्री सेकम दिपनगर, ता. भुसावळ असे मृत महिलेचे नाव निष्पन्न झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.

 

Protected Content