उद्या भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  भीमा कोरेगाव दंगल कटकारस्थान करुन घडवुन आणली असतांना आरोपी निर्दोष सुटु शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.  भीमा कोरेगाव आयोगासमोर सरकारने व पोलीस प्रशासनाने (मुळ) छेडछाड न केलेले व्हिडिओ सादर करावेत या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चातर्फे  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्या सोमवार दि. १८ जुलै रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष  देवानंद निकम यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे कळविले आहे.

 

प्रसिद्धी पत्राचा आशय असा की,   १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथे विजयी स्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेल्या जनसमुदायावर दंगलखोरांनी दगडफेक केली,त्यांच्या गाड्यांची जाळपोळ केली.  पोलीस प्रशासनासमोर झालेल्या या दंगलीची चौकशी करण्याकरिता आयोग गठीत करण्यात आला आहे. या आयोगासमोर जे पुरावे व्हिडियोच्या माध्यमातून पोलिसांनी दाखल केलेले आहेत त्यातील ब-याचशा व्हिडिओंमध्ये छेडछाड झालेली आहे. भीमा कोरेगावची दंगल हेतुपुरस्सर, कटकारस्थान करुन घडवुन आणली होती हे स्पष्ट होत असून देखील त्यातील आरोपी निर्दोष सुटु शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.  भीमा कोरेगाव आयोगासमोर सरकारने व पोलीस प्रशासनाने (मुळ) छेडछाड न केलेले व्हिडिओ सादर करावेत  असे न केल्यास भारत मुक्ती मोर्चा या सामाजिक संघटनेमार्फत ५ टप्प्यात चरणबध्द आंदोलन केले जाणार आहे.  सोमवारी दि.१८ जुलै रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पहिल्या टप्प्यातील स. ११ ते ५.३० या वेळेत धरणे आंदोलन केले जाणार आहे.

Protected Content