यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाचे उपसभापती तसेच शिरसाड ग्रामपंचायत सदस्य तेजस धनंजय पाटील यांची इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या जळगाव जिल्हा शाखेवर सहयोगी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. आगामी ३ वर्षांच्या अंतरिम कालावधीसाठी ६३ नवीन सदस्यांची निवड करण्यात आली असून तेजस पाटील यांचा या यादीत समावेश आहे.
जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार
जिल्हा नियोजन भवन येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते तेजस पाटील यांचा रेडक्रॉस सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रेडक्रॉस सोसायटीचे पदाधिकारी गनी जी मेनन, विनोद जी बियाणी, डॉ. प्रसन्न कुमार रेडासानी, घनश्याम जी महाजन, सुभाष जी सांखला, विजय जी पाटील, पुष्पाताई भंडारी, शांताबाई वाणी, डॉ. नरेंद्र ठाकूर आदी उपस्थित होते.
अनेक मान्यवरांकडून अभिनंदन
तेजस पाटील यांच्या निवडीबद्दल रावेर-यावल विधानसभा आमदार अमोल हरिभाऊ जावळे, भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन यांच्यासह तालुक्यातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.
रेडक्रॉस – जागतिक सेवाभावी संस्था
रेडक्रॉस ही १८७ देशांमध्ये ७० लाख स्वयंसेवकांच्या माध्यमातून कार्यरत असलेली आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्था आहे. सर हेन्री ड्यूनांट यांनी या संस्थेची स्थापना केली. भारतात १९२० साली दिल्ली येथे इंडियन रेडक्रॉस सोसायटीची स्थापना झाली. राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रपती, राज्यात राज्यपाल, तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
सेवाभावी उपक्रम
रेडक्रॉसच्या माध्यमातून २४ तास रक्तसेवा, कॅन्सर संजीवनी मार्गदर्शन केंद्र, दिव्यांग पुनर्वसन केंद्र, ई-सेतू सुविधा, निक्षय मित्र योजना आणि पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण यासारखे उपक्रम राबवले जातात. या प्रतिष्ठित संस्थेच्या जळगाव जिल्हा शाखेवर तेजस पाटील यांची निवड झाल्याने जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे.